दुष्परिणामांशिवाय AI चा स्वीकार
एकच भाषा न वापरल्याबद्दल क्षमस्व.
सध्या Artificial Intelligence (AI) आणि त्यांच्या परिणामाबाबत चर्चा सुरू आहे. याबद्दलचे एक चिंतन.
कळीचा प्रश्न हा आहे की, AI कामाच्या दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाल्यावर ते सामाजिक दृष्ट्या कसे यशस्वी करायचे?
जेव्हा AI कामाच्या दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाले आहे असे आपण म्हणू, त्याचा अर्थ सध्या जो Problem of Scarcity आहे त्याचे रुपांतर Problem of Abundance मधे झाले आहे असा होईल.
Strong people create good times. Good times create weak people. Weak people create bad times. Bad times create strong people. And so on.....
हे निसर्गाचे चक्र अव्याहतपणे चालू राहील. पण मानवी हस्तक्षेप करून good times ला weak people निर्माण करण्यापासून कसे रोखता येईल किंवा ते निदान लांबवता तरी कसे येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.
कधीकधी असं वाटतं की भारतीयांना हेच करण्यात अपयश आल्यामुळे तर मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमक इथे इतके यशस्वी झाले नसतील ना?
तर good times ला weak people निर्माण करण्यापासून कसे रोखायचे? एक उघड उपाय आहे की कृत्रिम रित्या मुलांना bad times म्हणजे कष्ट आणि कमतरता (माफक आणि Calibrated, अति आणि अमर्यादीत नाही!) यांमध्ये ठेवायचे.
माझा एक मित्र प्राथमिक शिक्षण घेताना एका Tier 3 / 4 शहरात राहत होता. त्यांच्या शाळेत बुद्धीबळाचे दोनच पट होते आणि खेळण्याची इच्छा असणारे विद्यार्थी खूप होते. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना खेळायला मिळावे यासाठी तिथे असा नियम होता की हरणाऱ्याच्या जागी दुसरा विद्यार्थी खेळेल आणि जिंकणारा एक सोंगटी कमी घेऊन खेळेल. माझा मित्र इथपर्यंत पोहोचला होता की सर्व आठ प्यादी नाहीयेत आणि शिवाय एक हत्ती, एक घोडा आणि एक उंटही नाहीयेत. तो पुढे National Championship ही खेळला. त्याने करियरमधे CA ची निवड केल्यामुळे त्याला बुद्धीबळासाठी फार वेळ देणे शक्य झाले नाही. नाहीतर तो बुद्धीबळात अजून खूपच पुढे गेला असता. तर ह्या उदाहरणावरून असे समजते की कमतरता कश्या तऱ्हेने व्यक्तीची घडण करते. अशी उदाहरणे तुम्हीही पाहिली असतील.
हीच गोष्ट कष्टांचीही आहे. कमतरता आणि कष्ट यातून व्यक्ती किती मोठी घडू शकते याचे नरेंद्र मोदी हेही एक उत्तम उदाहरण आहे.
आणि Problem of Abundance मधे मनमानी / बेलगाम पद्धतीने वागल्याने कसा सर्वनाश झाला यांचीही उदाहरणे आपण पाहिली असतील.
Problem of abundance मधे Universal Basic Income (UBI) द्यायला सुरुवात होईल. [UBI is a social welfare proposal where all citizens or residents receive a regular, *unconditional* cash payment from the government, regardless of their income, resources, or employment status.]
यातील unconditional हा भाग काढून टाकायचा आणि ठराविक नियम पाळणाऱ्यांनाच ते मिळेल असा कायदा करायचा. हे नियम काय असावेत याबद्दल विचारमंथन होणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे प्रौढावस्था येईपर्यंत ठराविक वयात ठराविक अशा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक इत्यादी Activities पूर्ण करणे अनिवार्य करायचे. यांमध्ये वैयक्तिक निवडीला वाव ठेवून नियम बनवता येतील.
पुढे प्रौढावस्थेतील जीवन जगताना काही नियम / मर्यादांचे पालन करणे अनिवार्य करावे लागेल.
UBI हे Credit Pointsशी जोडून ठेवायचे.
यांमध्ये अध्यात्मिकतेला प्रोत्साहन देऊन नागरिकांची सर्वांगीण उन्नती व्हावी असेही बघता येईल.
समाजातील इतरांना व्याप होणार नाही पण ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे सर्व गोष्टींची निवड करता येईल अशी रचना करता येणे शक्य आहे. शिवाय Burnout होऊ नये यासाठी काही Safety Nets काही Exit Routes काही अपवाद करणे यांचीही सोय करून ठेवायची.
अशा प्रकारे Problem of Abundance असतानाही सशक्त, सुदृढ, प्रवीण, IQ, EQ इत्यादींमधे उच्च असा समाज निर्माण करण्यासाठीची रचना करता येऊ शकेल.
घटनेसाठी जशी Constituent Assembly निर्माण केली होती, तशीच सुरुवातीचे नियम ठरविण्यासाठी काही अध्यात्मिक गुरु आणि बरेचसे / सर्व हयात पद्म पुरस्कार विजेते आणि काही इतर यांची एक Constituent Assembly निर्माण करता येईल. पुढील बदल संसद करू शकेल.
विचारमंथनाचे स्वागत आहे.
Comments
Post a Comment